Breaking News

खूशखबर ! खूशखबर ! खूशखबर ! कोरोना लसीची रशियाने

खूशखबर ! खूशखबर ! खूशखबर ! 

कोरोना लसीची रशियाने तारीख केली जाहीर; 

पुढील महिन्यात तीन कोटी डोस बनवणार

मॉस्‍को : कोरोनाने संपूर्ण जग अडचणीत असताना रशियाने कोरोनावर लस बनवली असल्याची घोषणा केली आणि सर्वांनाच दिलासा मिळाला. रशिया या वर्षी स्थानिक पातळीवर प्रायोगिक कोरोना लसीचे तीन कोटी डोस तयार करण्याची योजना आखत आहे. यापैकी 1 कोटी 70 लाख डोस परदेशात निर्माण करण्याची क्षमता आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच आम्ही कोरोना व्हायरसवरील लस तयार करण्याच्या दृष्टीने मानवी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली आहे, अशी घोषणा केली होती. यामुळे, कोरोना लस तयार करण्याच्या शर्यतीत आता रशिया इतर देशांच्या तुलनेत फार पुढे गेला आहे.

कधीपर्यंत येणार लस
रशियन वैज्ञानिकांनी दावा केला आहे, की कोरोना व्हायरसवरील जगातील पहिली लस ऑगस्ट महिन्यात लाँच होईल. गॅमेलेई नॅशनल रिसर्च सेन्टर फॉर एपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अलेक्झॅन्डर गिंट्सबर्ग यांनी सांगितले, कोरोना लस 12 ते 14 ऑगस्टपर्यंत लोकांना द्यायला सुरुवात होईल.

2 comments:

  1. आपलं अभिनंदन आपली न्यज सुरू केल्या बद्दल जयभीम

    ReplyDelete