रविवारपासून ‘मिशन ब्रेक द चैन’
रविवारपासून ‘मिशन ब्रेक द चैन’
![]() |
| जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर |
- नांदेड जिल्ह्यात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन
नांदेड, दि. – जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून ‘मिशन ब्रेक द चैन’ राबविण्यात येणार आहे. यासाठी उद्यापासून (रविवार) दि.12 ते 20 जुलैपर्यंत संपूर्ण जिल्हा आणि शहरात कडक संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे आदेश नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत. या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित केलेल्या आदेशाची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनातील विविध विभागाच्या यंत्रणेची पथके गठीत करण्यात आली आहेत.
नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूंचा दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव व रुग्णांची संख्या विचारात घेता नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी व खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हयात अटी व शर्तीच्या अधिन राहून संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याची माझी खात्री झाली आहे. 8 दिवसांकरिता नांदेड जिल्हयात दिनांक 12 जुलै अर्थात रविवारच्या मध्यरात्रीपासून ते 20 जुलै च्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू राहणार आहेत. संचारबंदीतून सर्व शासकिय कार्यालये त्यांचे कर्मचारी, त्यांची वाहने सर्व शासकिय वाहने. शासकिय कर्मचा-यांना कार्यालयीन ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक असणार आहे. सर्व शासकिय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने/आरोग्य कर्मचारी, वैद्यकिय रुग्णालयातील कर्मचारी वैद्यकिय अत्यावश्यक सर्व सेवा तसेच पशुवैद्यकिय दवाखाने व औषधालये, प्रिंट मिडिया, ईलेक्ट्रानिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी तर वर्तमानपत्र वितरक यांना घरपोच वाटपासाठी या काळात मुभा दिली जाणार आहे. मात्र यांना आपले ओळखपत्र जवळ बाळगावे लागणार आहे.
शहरातील नागरी, ग्रामीण व औद्योगीक सेवांकरीता आपली आस्थापने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत अटी व शर्थीच्या अधिन राहून मुभा देण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तुंमध्ये भाजीपाला, फळविक्रेते, दुधविक्रेते यांना 7 ते 2 या काळात फिरून व्यवसाय करावा लागेल. रेशन व रास्त भाव दुकानदारांसाठी 7 ते दुपारी 2 या कालावधीत आपली दुकाने तर पाणी प्लांट विक्रेत्यांना 7 ते 11 या दरम्यान दुकाने चालू ठेवावी लागणार आहेत. खत विक्री, बियाणे व्यावसायिकांना आपली दुकाने, गोदामे आणि वाहतूक करण्यासाठी सकाळी 7 ते 2 या काळात परवानगी आहे. बँकेत केवळ अत्यावश्यक शासनाच्या खात्यावर चलनाद्वारे रक्कम भरून घेण्याची मुभा राही. इतर बँक व्यवहारासाठी फक्त 10 व्यक्तींनाच परवानगी राहील.
दरम्यान, लॉकडाऊन काळात कडक संचारबंदीची अंलबजावणी करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित सोशल डिस्टसिंगचे पालन करावे, मास्क वापरावा, खिशात सॅनिटायझर ठेवावे, कामाशिवाय घराबाहेर पडू नये, प्रत्येकाने आपले सामाजिक भान ठेवून जबाबदारीने वागले तर प्रशासनाकडून ठेवण्यात आलेल्या 'मिशन ब्रेक द चैन' यशस्वी होईल.


No comments